एक्स्प्लोर

दहशत पसरवण्याच्या हेतूने पुण्यात टोळक्याचा राडा; पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

पुण्यात दहशत पसरवण्याच्या हेतून एका टोळक्याने बिबवेवाडी परिसरातील पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली आहे. सदर प्रकरणी 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : दहशत पसरवण्याच्या हेतूने एका टोळक्याने पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. रविवारी (7 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकुळानगर परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर ही वाहने पार्क केली होती. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही टोळक्यांनी लाकडी दांडक्याने या वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन दुचाकी, ऑटोरिक्षा आणि ओम्नी व्हॅनचे नुकसान झाले आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून तोडफोड करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, शनिवारी दारू पित बसलेल्या एका टोळक्याला हटकल्याच्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान यावर बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ : पुण्यातील येरवडा लेबर कॅम्पमध्ये 17 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटनस्थळांवर बंदी कायम

लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असताना वरुणराजा बरसू लागला, त्यामुळे पर्यटकांना पर्यटन केंद्र खुणावू लागली. पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी तर त्यांच्या आवडत्या लोणावळ्याला येण्याचं नियोजन ही केलं असेल. किंबहुना सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इतर धरणांचे पर्याय ते अवलंबण्याच्या तयारीत असतील. पण यंदा त्यांचा हिरमोड होणार आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या : 

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात दारुड्यांचा हल्ला

पर्यटकांचा हिरमोड होणार, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget