एक्स्प्लोर

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात दारुड्यांचा हल्ला

सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादात कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला.

पुणे : सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक नागरिक कुत्रा बाहेर निघून निघाले होते. त्यांनी या टोळक्याला येथे बसू नका म्हणत हटकले. त्यानंतर या टोळक्याने संबंधित नागरिकासोबत कुत्रा अंगावर सोडतो का म्हणत वाद घातला. त्यामुळे घाबरलेला हा नागरिक पुढे निघाला असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने बाटली फेकून मारली. यावेळी दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. दरम्यान गोंधळ सुरू असलेल्या ठिकाणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सोसायटीतील इतर नागरिकही पोहोचले. परंतु दारूच्या नशेत असलेले हे टोळके काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ अशी धमकी देखील यावेळी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून कोथरूड पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान यावर बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. आजच्या घटनेतही आरोपी पळून जात असताना पोलीस काहीच करू शकले नाही. पोलीस समोर उभे असताना संबंधित तरुण अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. यावरून त्यांना कुठलेच भय नसल्याचे स्पष्ट होते. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कोण आहेत मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी या 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मराठा मोर्चावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळेही त्या मध्यंतरी चर्चेत आल्या होत्या. काही मराठा संघटनांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी विद्यमान आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उभे राहिले होते. त्यानंतर निवडणुकीदरम्यान त्यांनी जाहीरपणे पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget