Pune bank froud : HDFC बँकेतील दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; काय आहे प्रकरण?
बारामतीतील जाळोची येथील एचडीएफसी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सीबीआय कोर्टाने सुनावली आहे. नितीन निकम आणि गणेश धायगुडे अशी शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
HDFC bank froud : बारामतीतील जाळोची येथील (Crime) एचडीएफसी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सीबीआय कोर्टाने सुनावली आहे. बारामती येथील एचडीएफसी बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर नितीन निकम आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह गणेश धायगुडे अशी शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सन 2020 मध्ये निकम आणि धायगुडे यांनी कर्जदाराला 99 लाखाचे कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदाराला दोन लाख 70 हजारांची लाच मागितली होती. वाटाघाटीअंती दोन लाख 25 हजार रुपये देण्याचं तक्रारदाराने मान्य केलं. सुरवातीची दोन लाख रक्कम देताना सीबीआयने गणेश धायगुडेला रंगेहाथ पकडले. कर्जदाराकडून लाच घेण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर नितीन निकम गणेश धायगुडेला सांगितलं होतं अस तपासात उघड झालं. 18 डिसेंबर 2020 या प्रकरणी चार्जशीट दाखल पुणे येथील कोर्टात करण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल 2023 मध्ये लागला आहे. सीबीआय कोर्टाने नितीन निकम यांना 60 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाची शिक्षा तर गणेश धायगुडेला 10 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाच कारावास सुनावला आहे.
शोध घेत दोघांना केली होती अटक
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांचा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सीबीआय अधिकाऱ्यांनी बारामती येथील आरोपींच्या कार्यालय आणि राहत असलेल्या भागात शोध घेत त्यांना अटक केली होती.