एक्स्प्लोर

Pune Crime: शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; एकीचा घरापर्यंत पाठलाग, शाळेतील नराधम कर्मचाऱ्याला अटक

Pune Crime: शाळेतील ॲडमिन ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानी शाळेतील तीन विद्यार्थिनी विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र आहे. बदलापूर, मंबई, अकोला, पुणे या ठिकाणी देखील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली, स्कुलबस मधून जाताना, रिक्षातून जाताना अशा अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील एका शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. (Pune Crime News) 

शाळेतील ॲडमिन ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानी शाळेतील तीन विद्यार्थिनी विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम सरफराज मन्सूर शेख या 32 वर्षाच्या शाळेतील कर्मचाऱ्यावर दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान सरफराज मन्सूर शेख या शाळेच्या ॲडमिन ऑफिसमध्ये काम करतो. शाळेतील तीन विद्यार्थिनींचे वेगवेगळ्या दिवशी बॅड टच करून विनयभंग केल्याची माहिती आहे. त्यावर न थांबता आरोपीने तीन विद्यार्थी पैकी एका विद्यार्थिनीचा घरापर्यंत पाठलाग देखील केला. विद्यार्थिनींनी हा सर्व प्रकार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगितल्यानंतर शाळेतील मुख्याध्यपकाच्या तक्रारीवरून दापोडी पोलिसांनी तातडीने सरफराज मन्सूर शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News) 

साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य

साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पतीनेच आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केलं आहे. तसेच त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्‍नीवर लैंगिक अत्‍याचार करण्‍यास सांगून त्‍याचे अश्लिल चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुनावळे येथे सप्‍टेंबर 2023 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत ही घटना घडल्याचं  पीडित पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे. (Pune Crime News) 

बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार 


 पुण्यातील बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला केला. शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आलं तर तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते, घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget