Pune News: शरद पवारांच्या नातीच्या फॅशन डिझाईन स्टोअरमध्ये चोरी; रोख रकमेसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास, तपास सुरू
Pune News: कल्याणी नगरमधील वस्त्र दालनात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. फॅशन डिझाईनर निवेदिता साबू यांच्या कल्याणी नगर परिसरातील वस्त्र दालनातून चोरट्यांनी रोख रकमेसह कपडे चोरल्याची घटना समोर आली आहे.
![Pune News: शरद पवारांच्या नातीच्या फॅशन डिझाईन स्टोअरमध्ये चोरी; रोख रकमेसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास, तपास सुरू Pune Crime News Theft at Bollywood fashion designer Nivedita Saboos boutique in Kalyani Nagar police investigating Pune News: शरद पवारांच्या नातीच्या फॅशन डिझाईन स्टोअरमध्ये चोरी; रोख रकमेसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास, तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/4c0e46e5f5773432cc4a347281a1dc3a1723182926995442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : कल्याणी नगरमधील वस्त्र दालनात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या कल्याणी नगर परिसरातील वस्त्र दालनातून चोरट्यांनी रोख रकमेसह (Pune Crime News) कपडे चोरल्याची घटना समोर आली आहे. एक लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत विक्रांत सुभाष इंदुलकर (26, रा. वृंदावन सोसायटी, पंचवटी, पाषाण) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. निवेदिता साबू या राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट)चे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) नात असल्याची माहिती आहे.
या घटनेप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांचे कल्याणी नगर भागातील सम्राट सोसायटीत निवेदिता प्रेट अॅण्ड काऊचर नावाचे वस्त्र दालन आहे. या वस्त्र दालनाच्या दरवाजाचे कुलूप तोडून बुधवारी (दि. 7-8) मध्यरात्री प्रवेश केलेल्या चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख 57 हजारांसह, सहा महागडे शर्ट असा एक लाख 99 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वस्त्र दालनातील (Pune Crime News) सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तीन चोरटे वस्त्र दालनात चोरी करत असल्याचे आढळून आले. पुढील तपास पोलिस करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर परिसरात बॉलिवूडमधील फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांचे स्टोअर आहे. चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री स्टोअरचे (Pune Crime News) कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर तिथून एक लाख 57 हजारांची रोकड आणि 42 हजार रुपये किमतीचे सहा शर्ट असा सुमारे एक लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे
बॉलिवूडमध्ये निवेदिता साबू प्रसिद्ध
निवेदिता साबू आघाडीच्या फॅशन डिझायनर आहेत. त्यांची पुण्यात आणि मुंबईत वस्त्र दालने आहेत. पॅरिस येथील फॅशन वीकमध्ये साबू यांनी तयार केलेल्या डिझायनर कपड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बॉलिवूड क्षेत्रातील अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या कपड्यांचे डिझाइन निवेदिता साबू यांनी केलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)