एक्स्प्लोर

Pune Crime News: 'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना

Pune Crime News: शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजन घटना समोर येत आहेत. आधी बदलापूर त्यानंतर, मुंबई, पुणे, अकोला, दौंड त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे.(Pune Crime News) 

शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबधित स्कूल व्हॅन चालकावर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगलात चोप दिला. त्यानंतर मनसैनिकांनी (MNS) स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातही मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू आहेत यामुळे पालक संताप व्यक्त करत आहेत, शाळेत आमची मुलं सुरक्षित नाहीत, कोणाच्या भरवश्यावर मुलांना पाठवावा असा सवाल ते उपस्थित करत आहेत. 

शाळेतील शिक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण (Pune Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड तालुक्यातील मळदमधील एका विद्यालयातील एका शिक्षकाकडून 7 वी, 8 वी, 9 वी मधील शिकत असणाऱ्या 3 ते 4 विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार (Pune Crime News) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. याप्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करीत असून संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे.

पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बदलापूर,अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget