एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यातील नाईट धिंगाणा बंद होणार; हॉटेल आणि पबसाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली जाहीर

पुण्यातील तरुणांचा हाच रात्रीचा धिंगणा थांबवण्यासाठी आयुक्तांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत   (Pune Crime News) चांगलीच वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) प्रयत्न सुरु आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. पुण्यात पब नाईटलाईफदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातील तरुणांचा हाच रात्रीचा धिंगणा थांबवण्यासाठी आयुक्तांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. 

पोलिसांनी केलेल्या सूचना कोणत्या?

- हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे आहे.

- स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.

- हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.

- सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत.
  
- हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी.

- कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे.

- हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा असावी.

पुणे पोलिसांनी करडी नजर

पुण्यात राज्यातून मोठ्या प्रमाणात तरुणाई आली आहे. त्यात पुण्यात मोठ्या आयटी कंपन्यादेखील आहे. राज्यातील विविध भागातून आलेले तरुण-तरुणींमुळे आणि पुणेकरांमुळे पुण्यातील नाईटलाईफमध्ये मोठा बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत भर पडण्याची अनेक कारणं आहेत. मात्र पुण्यातील नाईटलाईफमध्ये झालेला बदल आणि पब, हॉटेल्समुळे अनेक लोक रात्रीचे बाहेर पडतात. त्यात हुक्का आणि मद्यप्राशन करतात. त्यामुळे रात्री हा धिंगाणा अनेकदा रस्त्यावर दिसतो. हाच धिंगाणा रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्वाची पावलं उचलली आहे. त्यांनी प्राथमिकरित्या काही नियमावली घालून दिली आहे. 15 दिवसांसाठी ही नियमावली आहे. त्यावर 15 दिवस नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जाणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत हुक्का पार्लरवरदेखील पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. येत्या काही दिवसांत कायमची नियमावली जाहीर होणार आहे. पुण्यातील सगळ्यात वाईट आणि अवैध धंदे, पब, नाईटलाईफवर पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुणे ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट! आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड, मुंबई कनेक्शन आलं समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget