एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Pune Love Jihad : पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप, चार वर्षांनी हिजाबमध्ये परतली मुलगी, नेमकं काय घडलं?

देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे.

Pune Love Jihad : देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला 2019 मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं. 2019 पासून या मुलीचा शोध सुरु होता, मात्र अखेर ते दोघेही मंचरमध्ये परतल्याने आणि त्यात तिचं लग्न जावेद शेख सोबत झाल्याचं समोर आल्यानंतर हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या मंचरमधून अल्पवयीन मुलीला घेऊन पळालेला तरुण चार वर्षांनी परतला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 22 मे 2019ला हे दोघे मंचर सोडून गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार ही दाखल केली. मात्र तिचा शोध लागत नव्हता. ते पसार झाले होते. तेव्हा मुलगी अकरावीत शिकत होती, तर मिळेल ते काम करणारा जावेदचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. अशा परिस्थितीत दोघे घर सोडून गेले होते. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तरप्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा ही केला.

चार वर्षांनी मंचरमध्ये परतले!

त्यानंतर तब्बल चार वर्षानी ते मंचरमध्ये परतले. आठवड्याभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं, त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं. मग पोलिसांनी तिला बोलावून घेतला आणि वैद्यकीय चाचणीसाठी तिला रुग्णालयात पाठवलं, तिथं डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले असता. तिच्या बोलण्यातून हा घडला प्रकार समोर आला. मग पोलिसांनी तिच्याकडे अधिकची चौकशी केली, तेव्हा मी माझ्या मर्जीने जावेद सोबत निघून गेल्याचं आणि लग्न केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जावेदला अटक केली असून 363 सह 376 आणि पॉस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या जावेद येरवडा तुरुंगात आहे.

मुलाच्या आईवडिलांवर कारवाई होणार का?

या सगळ्या प्रकारात मुलाच्या कुटुंबियांचादेखील समावेश आहे, असं बोललं जात आहे. मात्र 2019 मध्ये हे दोघे पळून गेले होते. त्यावेळी आईवडिलांकडे मुलासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी मुलगा घरी नसल्याचं आणि त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं आईवडिलांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आता त्यांच्या आईवडिलांचीदेखील सखोल तपास करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमाचं आयोजनMahayuti Result 2024 : पराभवाचं कारण, धुसफुशीचं राजकारण ; महायुतीत आरोप-प्रत्यारोप Special ReportTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaPune Rain Water Logging : पुण्यात पाऊस,प्रशासन फूस्स! रस्त्यांवर पाणी, लाखोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
Embed widget