Pune Crime News : ज्योतिषींनीच गंडवलं! जादुटोण्याच्या नावाने पुण्यात महिलेला घातला 15 लाखांचा गंडा
ण्यातून जादुटोण्याच्या नावाने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काळी जादू घालवतो म्हणत ज्योतिषाने महिलेला घातला 15 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील वानवडी (Pune News) परिसरात ही घटना घडली आहे.
पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या (Pune Crime News) पुण्यातून आता अनेक जादुटोण्याच्या बातम्यादेखील समोर येत आहे. पुण्याच्या वैकुंठात रात्रीबे रात्री करणी केल्याच्या पुजा आणि येशूचं रक्त म्हणून लोकांना प्यायला दिल्यानंतर आता पुण्यातून जादुटोण्याच्या नावाने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काळी जादू घालवतो म्हणत ज्योतिषाने महिलेला घातला 15 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील वानवडी (Pune News) परिसरात ही घटना घडली आहे.
तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, त्यासाठी पूजा करावी लागेल, असे बतावणी करून तरुणीला 15 लाख 30 हजारांचा गंडा घालता आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशचा ज्योतिषी कृष्णनारायण तिवारी आणि अंतिम कृष्णनारायण तिवारी अशा 2 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2022 ते मे 2024 दरम्यान घडला. फिर्यादी यांची उत्तर प्रदेश मधील एका ज्योतिषी याच्याशी ओळख झाली होती. आपले पती सोबत नेहमी भांडण होतंय, असे तिने ज्योतिषी तिवारी याला सांगितले. यावर तुमच्या घरावर कोणी तरी काळी जादू केली आहे, ती नष्ट करतो, असे सांगत एके दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून त्या तरुणीच्या घरी गेला. पूजा झाल्यावर प्रसादात त्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. हे फोटो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इतरांना पाठवेल अशी धमकी देत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. धमकीला घाबरून त्या तरुणीने 15 लाख 30 हजार रुपये त्याला पाठवले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत तृतीयपंथीयांकडून चितेजवळ अघोरी प्रकार
यापूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत थरारक प्रकार समोर आला होता. दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. चितेजवळ फोटो, लिंबू, सुया आढळले आहेत. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोन (Pune police) तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती.
जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन
परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.