(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढली, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे आदेश
Pune News : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे.
Pune News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे. अशात लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस (Police) दलात मोठ्या मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी (Amitesh Kumar) महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे आदेश अमितेश कुमारांनी दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. या सर्व लोकांच्या संरक्षण व्यवस्थेत कार्यरत असलेल्या 350 पेक्षा जास्त मनुष्यबळाचा वापर आता निवडणुकी दरम्यान नियमित कामासाठी केला जाणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात यासाठी मोठी मदत होणार आहे.
- पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांकडून संरक्षण व्यवस्था पुरविण्यात येते
- पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो.
- पुणे शहरातील तब्बल 110 जणांना पोलिसांकडून संरक्षण पुरविण्यात येत असल्याची माहिती आहे.
- वरील सर्व लोकांना पोलिस संरक्षण पुरवण्यासाठी अंदाजे 350 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत होता.
- पोलीस आयुक्त्यांच्या आदेशानुसार आता 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले
निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील 11 हजार 83, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 19 हजार 652 आणि खाजगी जागेवरील 1 हजार 815 असे एकूण 32 हजार 550 जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच, लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :