Pune Crime : महिलेला पोलीस चौकीत बेदम मारहाण करणारा पोलीस कॉन्स्टेबल अखेर निलंबित
पुण्यातील महिलेला पोलीस चौकीत अमानुष मारहाण करणारा पोलीस कॉन्स्टेबल राहूल शिंगेले यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे.
Pune Crime news : पुण्यातील महिलेला पोलीस चौकीत (Pune) अमानुष मारहाण (Crime) करणारा पोलीस कॉन्स्टेबल राहूल शिंगे यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. अनेक दिवस पोलीस या महिलेची साधी तक्रार दाखल करून घेण्यासही तयार नव्हते. मात्र एबीपी माझाने हा प्रकार उघडकीस पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं आहे. पुण्यातील मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या कांचन दोडे यांना मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबल राहुल शिंगेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी त्यांना आता निलंबित करण्यात आलं आहे. 19 ऑक्टोबरला कांचन दोडे यांचे दुकान आणि मंडई पोलीस चौकीच्या मधे असलेल्या जागेत राहूल शिंगेने त्याची दुचाकी लावल्यावरुन दोघांमधे वाद झाला. हा वाद समोरच असलेल्या पोलीस चौकीत गेला. मात्र तिथं राहूल शिंगेने कांचन दोडे यांना बेदम मारहाण केली. मात्र पुढचे दहा दिवस पोलीस कांचन दोडे यांची साधी तक्रार दाखल करून घेण्यासही तयार नव्हते.
या मारहाणीत कांचन दोडे यांच्या चेहर्याला आणि उजव्या डोळ्याला इजा झाली. त्यांच्या दृष्टीवर देखील यामुळं परिणाम झाल्याचा अहवाल ससून रुग्णालयाणे दिला. पण तपास सुरु आहे असं सांगून पोलीस वेळ मारून नेत होते. अखेर एबीपी माझाने कांचन दोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आणि शेवटी या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार नो पार्किंगमध्ये कॉन्स्टेबलला गाडी लावण्यास विरोध केल्यानं मारहाण करण्यात आली होती. कॉन्स्टेबलने पिण्याच्या पाण्याचा जो नळ होता त्याच्यापुढे गाडी लावली होती. यावेळी मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेनं गाडी नळापुढे न लावण्याची विनंती पोलिस कॉन्स्टेबलला केली होती. यावेळी कॉन्स्टेबलने दमदाटीच्या भाषा केल्याची माहिती त्या महिलेनं दिली होती. मी गाडी इथेच लावणार, तुम्हाला जी तक्रार करायची ती करा असेही ते म्हणाले होते. तसेच त्यांनी शिवी देखील दिल्याची माहिती महिलेनं दिली होती. त्यानंतर मला पोलीस चौकीत बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी मला मारहाण केल्याची माहिती महिलेनं दिली होती. मी त्यांना कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नव्हती. ज्यावेळी मला मारहाण होत होती, त्यावेळी सोडवायला कोणीही आलं नसल्याचे महिलेने सांगितलं. मात्र पुणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा राहूल शिंगेच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरु होता. एबीपी माझ्याने हे प्रकरण उघडकीय आणलं होतं. त्यानंतर पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं.