एक्स्प्लोर

Pune Crime News : पुणे हादरलं! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरुन वाद; पोलीस संरक्षण असलेल्या बिल्डरकडून एकावर गोळीबार

सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. आज (24 जानेवारी) भरदिवसा ही घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Pune Crime News :  सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर (Pune Crime) बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक (Pune news) घडना घडली आहे. आज (24 जानेवारी) भरदिवसा ही घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.यामध्ये एकजण जखमी झाला आहे. रमेश जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.  या प्रकरणी गोळीबार (Crime news) करणार्‍या संतोष पवार याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून दोघांची बाचाबाची झाली होती. त्यावरुन बांधकाम व्यावसायिक संतोष पवारने रमेश राठोडवर गोळीबार केला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या परिसरातच ही घटना घडली. संतोष पवार देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज अ‍ॉटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरुन वादावादी झाली. हे भांडण रमेश राठोड यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष पवार यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या पायाला जखम झाली. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवार यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे. त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 गोळीबाराने पुणे हादरलं...

पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेक जण सर्रास हवेत गोळीबार करण्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फॅन्चायसी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात.  तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget