एक्स्प्लोर

Pune Crime News: धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून 11 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; त्रास सहन न झाल्यानं मुलीनं...शिरूर तालुक्यातील घटना

Pune Crime News: शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे: मागील काही दिवसांमध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने देश हादरला आहे, पालक संताप व्यक्त करत आहेत, अशातच मुलगी आणि बापाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यात कारेगाव या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका 35 वर्षीय नराधम बापाने आपल्या 11 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. हा दुर्दैवी घटना मुलीने आपल्या मोठ्या 13 वर्षीय भावाला सांगितल्यानंतर उघडकीस आली आहे. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना नराधम बापाला अटक केली आहे. तसेच आरोपी बापाविरोधात पोक्सोअंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे.

रांजणगाव पोलिसांनी या घटनाबाबत दिलेल्या माहितीनुसार, वशिम मधील हे कुटुंब कारेगाव येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. पिडीत मुलीचा बाप व्यवस्थित वागत नसल्याने त्याची पत्नी तीन वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांना सोडून निघून गेली. त्यानंतर बापाने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका महिलेशी संबंध ठेवले. परंतु काही दिवसांपूर्वी आरोपीच्या वागण्याला कंटाळून ती महिला देखील निघून गेली. त्यानंतर नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध (Pune Crime News) ठेवले. हा त्रास सहन न झाल्याने मुलीने आपल्या 13 वर्षीय मोठ्या भावाला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. त्याने आपल्या आईला फोन करुन घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर आईने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला फोन करुन संबधित घटनेची माहिती दिली.

त्यानंतर आईच्या मैत्रिणीने पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि परिस्थिती पाहुन रांजणगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. रांजणगाव पोलिसांनी आधी त्या पिडीत मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी (Pune Police) नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालायने आरोपीला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; पुण्यातील हडपसरमधील शाळेतील घटना


पुण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीचा शिक्षकाने विनयभंग (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) त्याचबरोबर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.

गणेश काकड असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन मुलीला (Pune Crime News) आरोपी शिक्षक गणेश काकड याने जुलै 2024 मध्ये घरचा पत्ता विचारला. नंतर मी वर्गामध्ये शिकवत असताना तू माझ्याकडे बघत जा, इकडे तिकडे बघत जाऊ नकोस. मी सुंदर आहे असे पीडित मुलीला आरोपी शिक्षकांनी वाटेत अडवून बोलत त्रास दिला. त्यावर पीडित मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शाळेतून पीडित मुलगी घरी जात असताना, तू घरी चालली आहेस का ? मी तुला तुझ्या घरी सोडू का ? तू कुठे राहतेस ? अशी विचारणा करून तिला त्रास (Pune Crime News) द्यायला सुरुवात केली. मुलगी २६ ऑगस्ट रोजी घरी परतली तेव्हा रडत होती. आईने विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घडला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊतRaj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
×
Embed widget