एक्स्प्लोर

Pune IT Engineer: 'सॉरी मला माफ करा...', हिंजवडीत आयटी इंजिनिअर तरूणीने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं

Pune IT Engineer: आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली आहे.

पिंपरी : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात तरूणांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यातील हिंजवडी परिसरात आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली आहे.

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (25, रा. हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवडी मधील एका 25 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मेच्या पहाटेच्या सुमारास घडली आहे. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे  या 25 वर्षीय तरुणीने  आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा  घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली असता लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4.42 सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरिल महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून, या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे. प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटले आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेले सुसाइट नोट सापडली आहे, त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, असं लिहिलेलं आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

नॅपकीन, मोबाइल पोलिसांनी केले जप्त

अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला असता तिने दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु, त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु, तिचा फोन बंद होता त्यामुळे संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तिच्या रूमची केली पाहणी असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. 'माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वतःच्या मर्जीने करत आहे.' असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Ketan Agrawal Case: 'माझ्या मुलाला न्याय द्या', केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक, ई-मेलमधील प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा!
'माझ्या मुलाला न्याय द्या', केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक, ई-मेलमधील प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा!
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Embed widget