Pune Crime News: 'काकांनी खाऊसाठी पैसे दिले अन्...', पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; असा झाला उलगडा, पालकांसह शिक्षकांना बसला धक्का
Pune Crime News: शाळेत मुलांना, मुलींना 'गुड टच बॅड टच' शिकवलं जात आहे, त्यांचं समुपदेशन केलं जातं आहे, मात्र, या दरम्यानच मुलींना आपल्यासोबत हे घडलं असल्याची जाणीव झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
पुणे: राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून महिला, अल्पवयीन मुली, यांच्यावरील अत्याचाराने देश हादरला आहे. अशातच बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर तर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरत असल्याचं चित्र आहे. या वाढत्या घटना आणि गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेली प्रकरणे यामुळे पालक, तज्ज्ञ आणि शाळा यांनी काही महत्त्वपुर्ण पावले उचलण्यास सुरवात केली आहे, शाळेत मुलांना, मुलींना 'गुड टच बॅड टच' शिकवलं जात आहे, त्यांचं समुपदेशन केलं जातं आहे, मात्र, या दरम्यानच मुलींना आपल्यासोबत हे घडलं असल्याची जाणीव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मुलींना 'गुड टच बॅड टच' शिकवत असताना त्यांच्यावरती अत्याचार (Pune Crime News) झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे, अशी धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत.
विद्यार्थिनीने शिक्षिकेला सांगितलं काय घडलं?
पुण्यात एका 11 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 67 वर्षीय व्यक्तीने पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पीडित कुटुंबाच्या (Pune Crime News) तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप नामदेव नावाच्या वृद्धाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि समुपदेशनासाठी शनिवारी शाळेत 'गुड टच' आणि 'बॅड टच' या विषयावर कार्यशाळा सुरू होती. यावेळी विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेला एका काकाने आपल्यासोबत असं गैरवर्तन केल्याचं सांगितलं. विद्यार्थिनीने शिक्षिकेला सांगितले की, काकांनी तिला घरी नेले आणि खाऊसाठी पैसे देऊन तिच्यासोबत गैरकृत्य (Pune Crime News) केलं.
विद्यार्थिनीने ही घटना सांगितल्यानंतर शिक्षिकांना धक्का बसला आणि तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. मुलीच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून याबाबत माहिती देण्यात आली. शिक्षक संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केली
पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी दिलीप नामदेव याला अटक केली. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. असे असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना
मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर (Pune Crime News) झालेल्या अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. हदलापूर, अकोल, पुणे, मुंबई, दौंड या ठिकाणी शाळेत, आणि इतर ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.