Pune firing : पुणे जिल्हा हादरला! होळीच्या दिवशीच एकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
पुणे जिल्ह्यातील तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्यात एकाचा गोळ्या (Firing In Pune) घालून खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune firing : पुणे जिल्ह्यात होळीच्या (Holi) दिवशीच एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्यात एकाची गोळ्या (Firing In Pune) घालून हत्या (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. या गोळीबारानंतर परिसरात सगळीकडे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण परसलं आहे. ऐन होळीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे .
गोळीबार होऊन हत्या झाल्याची माहिती दुपारी पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरु केला आहे. नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे (रा. पाबे, रामवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणूसे हे वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
नवनाथ रेणूसे यांची हत्या करणारे आरोपी हे त्यांच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे. खून झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडण्यात आल्या असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली आहे. रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत. वेल्हे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.
गोळीबाराने पुणे हादरलं...
पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकजण सर्रास हवेत गोळीबार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फ्रॅन्चायजी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात. तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.