एक्स्प्लोर

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ, त्या प्रकरणात पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

Pune Court : पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Eknath Shinde, Pune Court : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. याप्रकरणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात केस दाखल करण्यात आली असून सदर केस मध्ये दखल घेऊन साक्षी पुरावे तपासण्याचे सी आर पी सी 200 अन्वये आदेश दिले आहेत. शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 साली ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काय आरोप?  

सन 2009, 2014 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 147,कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र सादर केले होते. त्यानंतर त्यांनी 2019 ला 147,कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. एकनाथ शिंदे यांनी सन 2014 व 2019 मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशन अनेक तफावती दिसून येत आहेत. 

2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात शेयर्स यामधील गुंतवणुकीमधील युनिटचा तपशील लपवण्यात आला आहे. तर सन 2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात आरमाडा MH०६M२३८८ हे मोटार वाहन दि.30/01/2006 रोजी 96,720 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे तर   सन 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात आरमाडा MH०६M२३८८ हे मोटार वाहन दि.30/01/2006 रोजी 8,00, 000 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. 

2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी स्कॉर्पियो  MH04 FM289  हे मोटार वाहन दि. 24/04/2006 रोजी 1,33,000 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे तर  2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी स्कॉर्पियो  MH04 FM289  हे मोटार वाहन दि. 24/04/2006 रोजी 11,00,000 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. 

सन 2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी बोलेरो  MH04 EX464  हे मोटार वाहन दि.14/07/2011 रोजी 1,89,750 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे तर   2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी बोलेरो   MH04 EX464  हे मोटार वाहन दि.14/07/2011 रोजी 6,96,370 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. 

2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीने टेम्पो 407- MH04 CG6781  हे मोटार वाहन दि.10/04/2010 रोजी 21,360 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी टेम्पो 407- MH04 CG6781  हे मोटार वाहन दि.10/04/2010 रोजी 92,224 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे .

2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीने  इनोव्हा  MH04 CG 0567 हे मोटार वाहन दि. 04/04/2013 रोजी 6,42,230  रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी इनोव्हा इनोव्हा  MH04 CG 0567 हे मोटार वाहन दि. 04/04/2013 रोजी 17,70,150 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. 

सन 2009 , 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी  त्यांच्या पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले आहे तर सन 2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीने  सर्वे नंबर : 844,845 चिखलगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे दि 06/08/2009 रोजी जमीन खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी व त्यांच्या पत्नीने  2014 व 2019 मधील नमुना 26  /नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात व्यवसाय किंवा नोकरीच्या तपशिलात /उत्पन्नाच्या स्तोत्रांच्या तपशिलात त्याने कोठेही तो शेतकरी असल्याचे नमूद केले नाही.

सन 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी  त्यांच्या पत्नीकडे वाणिज्य इमारत  नसल्याचे नमूद केले आहे तर सन 2019 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीने  दुकानाचा गाळा -007 प्लॉट नंबर बी-51 , रोड नं 30 , वागळे इस्टेट ठाणे  येथे दि 20/11/2002 रोजी वाणिज्य इमारत  खरेदी केल्याचे नमूद केले आहे. 
 
2019 च्या नमुना 26 भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी  हाऊस नंबर 5 लँडमार्क को ऑ हौ सो ली फायनल प्लॉट नंबर 60 इस्टर्न एक्सप्रेस ठाणे (प ) ही निवासी इमारत दि 01/06/2010 रोजी 1,06,27,495 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर 2014 च्या नमुना 26  भाग -अ/नामनिर्देशन पत्रात / प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी  हाऊस नंबर 5 लँडमार्क को ऑ हौ सो ली फायनल प्लॉट नंबर 60 इस्टर्न एक्सप्रेस ठाणे (प ) ही निवासी इमारत दि 01/06/2010 रोजी 1,06,27,815 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget