एक्स्प्लोर

Suhas Diwase: 'योग्य वेळ आल्यावर...', पूजा खेडकरच्या आरोपानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची प्रतिक्रिया

Suhas Diwase: पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकरला उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. तर पूजा खेडकरने केलेल्या आरोपाबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

Suhas Diwase: आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) पुणे पोलिसांकडून आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये पूजा खेडकरला जबाब देण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकरने पुणे पोलिसांची पहिली नोटीस धुडकावल्यानंतर वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) भेट घेऊन दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकरला उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. तर पूजा खेडकरने केलेल्या आरोपाबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. 

पूजा खेडकरांनी (IAS Pooja Khedkar) जे आरोप केलेले आहेत त्यांची नोटीस मला मिळाली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे. योग्य वेळ आल्यावर मी याबाबत बोलणार, असंही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटलं आहे. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर छळवणूकीचा आरोप करत वाशीममध्ये तक्रार दाखल केली होती.

पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला पाठवली दुसरी नोटीस

पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) हजर राहण्यासाठी दुसरी नोटीस पाठवली आहे. पुणे पोलिसांनी पहिल्या नोटीसमध्ये आपल्या तक्रारीसंबधीचा जबाब नोंदवावा यासाठी तिला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र पूजा जबाब नोंदववण्यासाठी न आल्याने पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस पाठवली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकरची भेट घेऊन ही नोटीस दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकरला उद्या (शनिवारी) पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. 

पुजा खेडकरनी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी २० जुलैला उपस्थित राहावे यासाठी पुणे पोलीसांनी दुसऱ्यांदा नोटीस दिली आहे. पुणे पोलिसांनी तिला पहिल्यांदा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलावल्यानंतर आपल्याला लगेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी येणं शक्य नाही असं उत्तर पुजा खेडकरनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांकडून दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या पुजा पुण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पूजा खेडकर वाशीममध्ये तळ ठोकून


पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) आपला वाशिम येथील मुक्काम दोन दिवस वाढल्याची माहिती आहे. पूजा खेडकर जवळपास 66 तास उलटून वाशिमच्या विश्रामगृहावर गोदावरी खोलीत आपला मुक्काम ठोकून आहे. पूजा आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या सर्व गोष्टी आपल्या खोलीमध्येच बोलून घेत असल्याची माहिती आहे. गेल्या 66 तासापासून पूजा खेडकर बंद खोलीत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याबाबत केलेल्या तक्रारीचा जबाब पूजाने पुणे पोलीसाकडे नोंदवणे अपेक्षित होतं. मात्र पुण्यात हजर न राहता पूजा खेडकरने वाशिमला मुक्कामी राहणं पसंत केलं. पूजा खेडकरला पुण्यासह 20 तारखेपर्यंत मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात देखील हजर राहावं लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget