Pune Car Accident: त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली, पुणे अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीचं ट्विट व्हायरल
Pune News: पुण्यातील धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघातप्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते.
![Pune Car Accident: त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली, पुणे अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीचं ट्विट व्हायरल Pune Car Accident NCP leader Prajakta Tanpure wife Sonali Tanpure tweet viral talk about teenage accused harassed my son in school Pune Car Accident: त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली, पुणे अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीचं ट्विट व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/2eb21ecc7cb30ab546b0b62689f856b31716341519605954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेने घेतलेल्या अनाकलनीय भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. पुण्यासह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. या सगळ्या घडामोडींनंतर आता ब्रह्मा कॉर्पचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal), त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि एकूण कुटुंबाविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघातप्रकरणातील (Pune Accident) मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
अपघात प्रकरणात कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा याविषयी भाष्य करत कठोर कारवाईची हमी दिली आहे. पोलीस आयुक्तांशी माझे बोलणे झाले. संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. पुणे पोलीस आयुक्तांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)