एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात  भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

कसबामध्ये पावने तीन लाख तर चिंचवडमध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदार 

270 मतदान केंद्रांवर कसबा मतदारसंघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा आरोप

भाजपने  पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. याला विरोध म्हणून धंगेकरांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं असं धंगेकरांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

Ravindra Dhangekar : भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप; आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget