एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ravindra Dhangekar : भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप; आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार

पोलिसांना सोबत घेऊन भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलाय. याविरोधात धंगेकर आज उपोषण करणार आहेत.

Pune Bypoll Election : भारतीय जनता पक्षानं (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे (Kasba Constituency) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज (25 फेब्रुवारी) कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय. 

सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार 

भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांचे उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे.

कसबा मतदारसंघात रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने तगडी लढत

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळं भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळं धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळं कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे.

CM Eknath Shinde : हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो

दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच (BJP) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. काल दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Patil on EVM : वाढलेलं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं ?  - राजू पाटीलSanjay Raut Full PC : जगभरात हिंदू संकटात याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार - राऊतSaundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
Embed widget