एक्स्प्लोर
Pune Bypoll election : आपल्या नावावर भलत्यानेच मतदान केलं! कसब्यात बोगस मतदान झाल्याचा मतदारांचा आरोप
अनेक मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच मतदान त्यांच्या आधीच कोणीतरी मतदान केल्याचं आढळून आलं. या प्रकारावरून बोगस मतदान झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Pune bypoll election file photo
Pune Bypoll election : अनेकदा आपण निवडणुकीत (Pune Bypoll Election) बोगस मतदान होत असल्याचे आरोप प्रत्यारोप होत असल्याचं बघितलं आहे. आज कसबा मतदारसंघात देखील मतदारांना असाच अनुभव आला. अनेकांना ते जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच मतदान आधीच कोणीतरी केल्याच आढळून आलं. आपल्या नावे बोगस मतदान झाल्याच लक्षात येताच या मतदारांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणूक यंत्रणेनी याची गंभीर दखल घ्यावी अशी या मतदारांनी मागणी केली आहे.
आणखी वाचा























