एक्स्प्लोर

Pune Bypoll election : कसब्यात कॉंग्रेसचं कसं बा व्हायचं? बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी, उमेदवारी अर्ज भरणार

पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Pune Bypoll election : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या  (Kasba Bypoll Election)  उमेदवारीवरुन वातावरण तापलं आहे. एकीकडे टिळकांना उमेदवारी न दिल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवार घोषित केल्याने कॉंग्रेसचे नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब दाभेकर उद्या (मंगळवार 7 फेब्रुवारी 2023) सकाळी 10 वाजता कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपकडून आणि कॉंग्रेसकडून आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे उद्या दाभेकर कार्यकर्त्यासाहित दुचाकी वाहनांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. ही रॅली नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून सुरू होणार आहे. तेथून पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त होणार आहे. या रॅलीच्या सांगतेनंतर दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरीता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरीता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कसबा मतदार संघात हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसब्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून इच्छूक उमेदवारांनी मोठी यादी होती. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेदेखील या जागेवर दावा केला होता. मात्र कसबा मतदार संघात सुरुवातीपासून कॉंग्रेसचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला दिली जाणार अशा चर्चा होत्या त्यात कसब्यात महाविकास आघाडीकडून  नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रविंद्र धंगेकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित करण्यात आलं आहे. त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. त्यानंतर मागील अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये सक्रिय असलेले बाळासाहेब दाभेकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याचं चित्र आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget