एक्स्प्लोर

तीरा पाठोपाठ वेदिकालाही 'ते' औषध मिळणार; तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून 16 कोटी जमवले

या संपूर्ण औषधांचा खर्च उभारण्यासाठी मला माझे नातेवाईक मित्र परिवार आणि त्यापेक्षा असे दानशूर व्यक्ती आहे जे मला माहितही नाही. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आमच्या घरात आता उत्सुकता लागली आहे ती जून महिन्यात वेदिकाला औषध मिळण्याची.

पिंपरी चिंचवड : गेली तीन महिने जीवाचे रान करून पिंपरी चिंचवड येथील सौरभ शिंदे यांनी आपल्या मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा करण्यात यश आले आहे. त्यामुळे त्यांची 11 महिन्यांची वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे 'झोलजेन्स्मा’ हे औषध जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वीच हे औषध मुंबई येथील तीरा कामत या 8 महिन्याच्या मुलीला देण्यात आले असून तिच्या पालकांच्या मते तीरा औषधाला चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या असून लवकरच त्यांच्या मुलीला हे औषध पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. 

तीरा आणि वेदिका या दोघीनांही स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) हा दुर्मिळ आजार आहे. ह्या आजारात व्यक्तीमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी जो जीन असणे अपेक्षित असते तो नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया ही मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे, त्याशिवाय हालचाली करणे या सर्व गोष्टींवर बंधने येऊ लागतात आणि परिस्थिती गंभीर होत जाते. अशा या दुर्मिळ आजारांवर परदेशात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे आणि अमेरिकेत या आजारासाठी काही औषधे हल्लीच उपलब्ध होत झाली आहेत. मात्र, ती औषधं मोठ्या प्रमाणात महागडी असून ती उपचारपद्धती घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते.

Teera Kamat : चिमुकल्या तीराचा औषधांना सकारात्मक प्रतिसाद!

25 फेब्रुवारीला तीराला या आजारावरील औषध देण्यात आले होते. हे औषध अमेरिकेवरून आणण्यात आले होते. हे औषध राज्यात कोणत्याही रुग्णलयात देण्यात येत नाही. ते औषध रुग्णाला देण्यासाठी आवश्यक असा परवाना लागतो जो मुंबईतील हिंदुजा रुग्णलयाला असल्याने तीराला त्या रुग्णालयात सलाईनद्वारे ते औषध देण्यात आले होते. याप्रकरणी अधिक माहिती देताना तीराचे वडील मिहीर कामत सांगतात, "हे औषध दिल्यानंतर गेल्या तीन महिन्यात तीराच्या तब्बेतीतील प्रगती चांगली आहे. आमचा डॉक्टरांकडे रीतसर जाणे होत असते. ते सुद्धा तीरा औषधाला चांगला प्रतिसाद देत असल्याने समाधानी आहेत. अजून काही दिवस तिला पोर्टेबल व्हेंटीलेटरवर ठेवावे लागणार आहे."


तीरा पाठोपाठ वेदिकालाही 'ते' औषध मिळणार; तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून 16 कोटी जमवले

तीरा कामत    

या अशा पद्धतीने या आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरे मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला काही महिन्यापूर्वीच हिंदुजा रुग्णालयात देण्यात आले होते. देशात आतापर्यंत 11 बाळांना हे औषध देण्यात आले आहे. तीरावर हिंदुजा रुग्णालयातील लहान मुलांच्या न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निलू देसाई उपचार देत आहेत. या रुग्णालयात अजून अशाच आजाराची 7-8 मुले आहेत, त्यांना या पद्धतीचे उपचार मिळावेत त्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. 

सौरभ शिंदे यांनी  एबीपी माझा डिजिटलशी बोलताना या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, "या औषधासाठी लागणारी संपूर्ण 16 कोटी रक्कम क्राऊडफंडिंग मधून जमा करण्यात आली आहे, लवकरच ती रक्क्म संबंधित कंपनीकडे जमा करण्यात येईल. त्या संदर्भातील पत्रव्यवहार सुरु करण्यात आला आहे. परदेशातून येणाऱ्या या औषधांवरील कर माफ करण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. त्याकरिता सिनेअभिनेते निलेश दिवेकर यांनी मदत केली आहे. या संपूर्ण औषधांचा खर्च उभारण्यासाठी मला माझे नातेवाईक मित्र परिवार आणि त्यापेक्षा असे दानशूर व्यक्ती आहे जे मला माहितही नाही. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आमच्या घरात आता उत्सुकता लागली आहे ती जून महिन्यात वेदिकाला औषध मिळण्याची. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील सर्व व्यवस्थापनाचा आभारी आहे, त्यांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे. सध्या डॉ. संदीप पाटील वेदिकावर उपचार करत आहेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget