एक्स्प्लोर

Pune Accident : पुण्यात डंपर पलटी होऊन दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, चेंदामेंदा झालेल्या शरीराचे तुकडे गोळा करताना फायरब्रिगेडच्या जवानांनाही गहिवरुन आलं

Pune Accident : शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटूंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या (Pune Accident News) मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थीनींचा हकनाक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे  (Pune. हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडिमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं (Pune Accident News) नियंत्रण सुटलं. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी (Pune Accident News) झाला, पण दुर्दैवाने त्याचवेळी रेडिमिक्स डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली, दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटविण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आली आहे. या दोघींही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी

या दुर्दैवी घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी शेजारून दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. ही घटना हिंजवडी- माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ काल (शुक्रवारी 24 रोजी) सायंकाळच्या सुमाराल घडली आहे. डंपरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

प्रांजली महेश यादव (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल (शुक्रवारी) सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या गेल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला. 

मृतदेहाचे तुकडे फावड्याने...

पलटी झालेल्या या डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होतं. चालकाचं वळणावरतीच डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या बोजाखाली दबल्या गेलेल्या या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटूंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Embed widget