एक्स्प्लोर

Vijay Doiphode Accident : स्वप्नांचा जीव घेणारे पुण्यातील खड्डे! पै. विजयची मृत्यूशी झूंज सुरूच; उपचारासाठी लाखोंची गरज, पुनीत बालन यांच्याकडून मदतीचा हात

Vijay Doiphode Accident : पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 वर्षांच्या एका पैलवानाची मृत्युशी झुंज सुरु आहे.

Vijay Doiphode Accident : पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 वर्षांच्या एका पैलवानाचा अपघात झाला सध्या तो मृत्युशी झुंज देत आहे. कोल्हापूरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या 22 वर्षांच्या पैलवान विजय डोईफोडेने (Vijay Doiphode) आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. तो गेल्या आठवड्यात दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेला होता. त्यावेळी विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. 

या अपघातामध्ये विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला असून तो अपघात झाला तेव्हापासून बेशुद्ध आहे. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारांसाठी लाखों रुपयांची गरज असून त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात आलं आहे. 

त्याच्या तब्येतीबद्दल एबीपी माझाला माहिती देताना विजयची बहिण म्हणाली, अद्याप तो शुध्दीवरती आलेला नाही. त्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर 72 तास झाले असून तो अद्याप शुध्दीवर आलेला नाही. पुण्यात आल्यानंतर त्याचा अपघात झाला, तेव्हापासून तो बेशुध्द अवस्थेत आहे.

एबीपी माझाच्या बातमीनंतर पुनीत बालन यांच्याकडून विजयच्या उपचारांसाठी मदत 

एबीपी माझाच्या बातमीनंतर  पैलवान विजय डोईफोडे (Vijay Doiphode) याच्यासाठी मदतीचे हात पुढे येऊ लागलेत. विजयच्या उपचारांसाठी पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांनी 5 लाखांची मदत केली देऊ केली आहे. विजय हा राज्यस्तरीय पैलवान आहे. पुण्यात फिजियोथेरेपी करण्यासाठी आला होता. मात्र पुण्यातील खड्ड्यांमुळे तोल जाऊन त्याचा अपघात झाला. त्यानंतर तो गंभीर जखमी झालाय खड्यांमुळे एका पैलनाचं आयुष्य पणाला लागू शकतं, हे यातून स्पष्ट झालं आहे. गंभीर जखमी झालेल्या विजयला पुनीत बालन यांच्याप्रमाणे इतरांकडून देखील आर्थिक मदतीची गरज आहे.

याबाबत बोलताना पुनीत बालन म्हणाले, विजय डोईफोडे (Vijay Doiphode)ला जी मदत लागणार आहे ती आम्ही करू. त्याने अनेक पदकं आपल्या महाराष्ट्रासाठी जिंकली आहे, त्याच्या उपचारांसाठी पुनीत बालन ग्रुपकडून 5 लाखांची मदत केली आहे. गरज पडल्यास त्याला दुसऱ्या एखाद्या चांगल्या रूग्णालयात शिफ्ट करण्यात येईल, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत करण्यात येईल असंही पुनीत बालन यांनी यावेळी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंनी केली दीड लाखांची मदत

मांडवे गावचा सुपुत्र पैलवान विजय डोईफोडे याच्या वैद्यकीय उपचारासाठी पंकजा  मुंडे यांच्या सूचनेनुसार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने उपचारासाठी दीड लाखाची आर्थिक मदत  विजयच्या कुटुंबियांना करण्यात आली आहे.   

पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

पुण्यातील मध्यवर्ती भागासह शहर परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन वाट काढताना वाहनधारकांची तारांबळच उडत आहे, आपला जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करत आहेत. प्रवास करताना खड्डे चुकवताना अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे. याच अपघातामुळे पैलवान विजय डोईफोडे (Vijay Doiphode) मृत्यूशी झूंज देत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तामे उपस्थित केला जात आहे.

तुम्ही देखील विजयला मदत करू शकता

GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ )
Account details-
Name - Vijay Jijaba Doiphode 
Bank Of India, Vaduj 
Account Number-131910510004828
IFSC - BKID0001319
UPI id : rajudoiphode2222-2@okicici

संबधित व्हिडिओ - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget