एक्स्प्लोर

मोठी बातमी : पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

Pune Accident: प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली.

पुणे: पुण्यातून (Pune Accident) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची (Pune Accident) घटना घडली आहे. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो  आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत.(Pune Accident) 

नेमकं काय घडलं?

या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये यात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - नाशिक महामार्गावरती एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो प्रवास करत होता. आयशरने जोरात धडक दिल्याने  मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आपटली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

आमदार शरद सोनवणे घटनास्थळी दाखल

घटनास्थळी आमदार शरद सोनवणे दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, नारायणगावमध्ये ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. फार गंभीर अपघात झाला आहे. पुणे नाशिक हायवे वरती अपघात झाला आहे. एका आयशर टेम्पो चालकाने मागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला धडक दिली. ते वाहन पुढे जाऊन एसटीला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक जण दगावले. काही जण जखणी झाले आहेत, आम्ही आता सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत, काही महिलांचा समावेश आहे अशी माहिती कळते. हा अपघात गंभीर होता प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सांगितलं या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो पळून गेला. पण, पोलिसांनी त्याला शोधण्याचा काम केलं आहे. पुढे आयशरला पकडलेलं आहे. त्यामुळे खरा अपघात या आयशर चालकामुळे घडला आहे, अशी माहिती यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.

पोलिस प्रकरणाचा तपास करतील. नेमकं काय घडलं आहे ते समोर येईल. आम्ही घटनास्थळी आलो आहोत. अपघातात गंभीर जखमींना सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केलेलं आहे. आसपासच्या परिसरातीलच ही लोक असल्याची माहिती आहे. आळेफाटा ते नारायणगाव असे प्रवास करणारे सर्वजण होते, याच मार्गावरती वाहतूक करणारे ते वाहन होते. या वाहनाची भीषण अवस्था झाली आहे. आयशर आणि त्या बसच्या मध्ये त्या छोट्या वाहनाचा चुराडा झाला आहे. मी आता सरकारी दवाखान्यात चाललो आहे. तिथे मी प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेऊन बोलेन. जे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू असंही पुढे ते म्हणालेत. 

या ठिकाणी अनेकदा अपघात झालेले आहेत. वाहन चालक ओव्हरटेक करण्याच्या नादात भान न राखता वाहने चालवतात. सकाळच्या वेळी हा अपघात झाला आहे. अशा प्रकारे वाहन चालक आपल्या वाहन चालवत असतील तर ते फार चुकीचा आहे, असंही आमदार शरद सोनवणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांनाप्रती मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर त्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. "पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget