Pune Premature Baby : सहाव्या महिन्यातच प्रसुती, 400 ग्रॅम वजन! पुण्यातील इंजिनियर दाम्पत्याने दिला आतापर्यंतच्या सर्वात लहान प्रीमॅच्युअर बाळाला जन्म
पुण्यातील सूर्या हॉस्पिटममध्ये मागील मे महिन्यात 24 व्या आठवड्यातच एका बाळाने जन्म घेतला. हे बाळ आतापर्यंतच्या प्रीमॅच्युअर बाळांमध्येही सर्वात लहान बाळ आहे. या बाळाचं वजन 400 ग्रॅम आहे.
Pune Premature Baby : पुण्यातील सुर्या मदर अॅन्ड चाईल्ड केअर सेंटरमध्ये (Baby) मागील मे महिन्यात 24 व्या आठवड्यातच एका बाळाने जन्म घेतला होता. (Pune) हे बाळ आतापर्यंतच्या प्रीमॅच्युअर बाळांमध्येही सर्वात लहान बाळ आहे. या बाळाचं वजन 400 ग्रॅम आहे. भारतात आतापर्यंत अनेक प्रीमॅच्युअर बालकं जन्माला आली आहेत. मात्र 24 व्या आठवड्यात जन्माला आलेलं हे पहिलंच बाळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. शिवन्या असं या बाळाचं नाव आहे. प्रीमॅच्युअर जन्माला आलेलं सर्वात लहान आणि भारतातलं सर्वात लहान बाळ म्हणून डॉक्टरांनी वर्णन केले आहे.
मे महिन्यात पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या उज्वला पवार यांना एमर्जन्सी प्रसुतीसाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी पवार या 24 आठवड्यांच्या गर्भवती होत्या. त्यांनी 24 व्या आठवड्यातच मुलीला जन्म दिला होता. त्या मुलीचं वजन 400 ग्रॅम होतं. प्रीमॅच्युअर जन्माला आलेले बाळ फार नाजूक असतात. त्यामुळे या प्रीमॅच्युअर बाळावर तातडीने उपचार करण्यात आले.
बाळाला पाहून डॉक्टर अवाक्
24 व्या आठवड्यात म्हणजेच सहाव्या महिन्यात हे बाळ जन्माला आलं होतं. त्यामुळे हे बाळं हाताळणंही डॉक्टरांसाठी फार कठीण होतं. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत बाळावर उपचार केले. मात्र बाळ वाचणार की नाही याबाबत डॉक्टरांना शंका होती. मात्र पवार या खंबीर होत्या. त्यांनी बाळाबाबत काहीही वाईट विचार केला नाही आणि धीरही सोडला नाही. एवढ्या लहान बाळाला पाहून आणि तिच्या आईचं धाडस पाहून डॉक्टरही काही काळ अवाक् होते.
94 दिवस बाळावर उपचार सुरु
21 मे रोजी या बाळाचा जन्म झाला होता. प्रकृती फार नाजूक असल्याने बाळाला 94 दिवस अतिदशता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 23 ऑगस्टला या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. बाळाचा जन्म झाला त्यादिवशी बाळाचं वजन 400 ग्रॅम होतं आणि 92 दिवसांनी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला त्यादिवशी बाळाचं वजन साधारण 2,130 ग्राम होतं. बाळाची आता घरात हळू हळू वाढ होत आहे.
डॉक्टरांची कमाल...
पुण्यातील अनेक डॉक्टरांनी अशा अनेक प्रकारच्या दुर्मिळ सर्जरी केल्याचं आपण बघितलं आहे. मात्र 24 व्या आठवड्यातच बाळाला जन्म देऊन त्या बाळाला जगवणं हे डॉक्टरांसमोरही मोठं आव्हान होतं. मात्र डॉक्टरांनी आणि कुटुंबियांनी धीर न सोडल्याने आज शिवन्या या जगात आहे.