एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात? : जावडेकर
शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
पुणे : शाळांनी भीकेचा कटोरा घेऊन नेहमी सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक सहाय्य मागावं, असं वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. जावडेकरांच्या विधानामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात? माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात? माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे. किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे, असंही जावडेकर म्हणाले.
शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे. माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र जावडेकरांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर नाराजीचा सूर उमटला आहे.
ज्ञानप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. अन्य शाळांसाठी हा आदर्शच आहे. ज्ञानप्रबोधिनीने सुरु केलेली परंपरा इतरांनी चालवावी, अशा भावनाही जावडेकरांनी व्यक्त केल्या.
Who runs educational institutions? Alumni. Those who once studied there, became successful later give it back to them. It has been a trend in Jnana Prabodhini. I was told that alumni here do as much as they can for the school: P Javadekar in Jnana Prabodhini School, Pune (13.09) pic.twitter.com/yNaOVwkaMe
— ANI (@ANI) September 15, 2018
Aise school bhi chalte hain. Nahi to har baar sarkar ke paas katora lekar jaenge aur baat karenge ki hamein madad chahiye. Arey madad to aapke ghar mein padi hai. Aapke jo purv chhatra hain unki bhi zimmedari banti hai: Union Minister Prakash Javadekar in Pune (13.09.2018) pic.twitter.com/z5xSTkEAPs
— ANI (@ANI) September 15, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement