एक्स्प्लोर

Uday Samant : इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस दाखवावं; मंत्री उदय सामंतांचं खुलं आव्हान

इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा, असं खुलं आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

पुणे : इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान (INDIA Alliance) पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा, असं खुलं आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलं आहे. 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' च्या पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं.

उदय सामंत  नेमकं काय म्हणाले?

ते म्हणाले, 'इंडिया आघाडीच्या तीन बैठका मी बघितल्या आहेत. मी राजकारणातला लहान माणूस आहे. पहिल्या बैठकीतील नेते दुसऱ्या बैठकीला नव्हते दुसऱ्या बैठकतील तिसऱ्या बैठकीला नव्हते. या आघाडीत जे पंतप्रधान पदाचे दावेदार होते. त्यांनीच वेगळी भूमिक घेतली आहे. त्यामुळे येत्या बैठकीत इंडिया आघाडीने पंतप्रधान मोंदीच्या विरोधात लढणारा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस दाखवावं, असं खुलं आव्हान त्यांनी इंडिया आघाडीला दिलं आहे. 

त्यासोबतच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्या वादावरदेखील त्यांनी भाष्य केलं. 'मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकार ला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये, अस आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील आणि बारसकर महाराज यांना केलं आहे.

'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'तून काय मिळणार 

संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

तीन दिवस प्रदर्शन पाहता येणार

सामंत म्हणाले, 24 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत 3  दिवस सुरू राहणार असून त्यासाठी 20 दालने तयार करण्यात आली आहेत. तसेच खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येतील. या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे, शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असेही ते म्हणाले. प्रदर्शनातील चार भव्य  दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असं सामंत यांनी सांगितले.

इतर महत्वाची बातमी-

Pune Traffic Diversion : बंडगार्डन आणि कोरेगाव पार्कमधील वाहतुकीत बदल; कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special ReportRaj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special ReportManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Embed widget