एक्स्प्लोर

Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?

Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यात उपस्थित आहेत, या मेट्रोमधून (Pune Metro) आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित नेते महिला आणि लहान मुले पहिल्यांदा प्रवास करणार आहेत, त्यांनतर आज दुपारी ४ वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट अशी 4 मेट्रो स्थानके आहेत. 

कसं असणार या मार्गावरचं तिकीट दर?

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: 10 रुपये

जिल्हा न्यायालय ते मंडई: 15 रुपये

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट: 15 रुपये

स्वारगेट ते मंडई: 10 रुपये

स्वारगेट ते कसबा पेठ: 15 रुपये

स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: 15 रुपये

आणखी या विकासकामांचं मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण आणि उद्घाटन 

- स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन

- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन

- भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन

- राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित

मागचा दौरा पावसामुळे झाला होता रद्द

26 सप्टेंबर रोजी निश्चित झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत पाहून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक (Pune Metro) या मार्गाचे लोकार्पण केला आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत आहेत.(Pune Metro inaugurate)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
Sushil Kumar Shinde : तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हिंदू दहशतवादवरून स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?
तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हिंदू दहशतवादवरून स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?
शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
Sharad Pawar: विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण
विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझाAnandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तकNitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखलेAkshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
Sushil Kumar Shinde : तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हिंदू दहशतवादवरून स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?
तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हिंदू दहशतवादवरून स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?
शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
Sharad Pawar: विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण
विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण
Nepal Flood | Helene Cyclone In America : नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी
नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी
Manoj Jarange: मनोज जरांगेंची अमित शाहांवर घणाघाती टीका, म्हणाले, 'कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?'
मनोज जरांगेंची अमित शाहांवर घणाघाती टीका, म्हणाले, 'कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?'
अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला, उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी; 7 व्या दिवशी अंत्यविधी
अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला, उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी; 7 व्या दिवशी अंत्यविधी
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु वक्री; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget