एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रेकी करुन घरफोडी, चोराला पकडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार

पुनावळे येथील गगनगिरी सोसायटीत 6 सप्टेंबरच्या भरदुपारी हा चोरटा घुसला.

पिंपरी चिंचवड : सोसायटीची रेकी, कुलुप बंद फ्लॅटमध्ये प्रवेश अन् कपाट तोडून सोने चांदीचे दागिने लंपास. अवघ्या दहा मिनिटांत तेही दिवसा ढवळ्या झालेली ही घरफोडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या पुनावळे इथली ही घटना आहे. हा महातरबेज चोरटा नेहमीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. म्हणूनच आता त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांना त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळ आली आहे. पुनावळे येथील गगनगिरी सोसायटीत 6 सप्टेंबरच्या भरदुपारी हा चोरटा घुसला. दुपारचे दोन वाजून दोन मिनिटं झाली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने हातात एक कागद घेतला होता. जणू मोठ्या हुद्द्यावर नोकरीसाठी असल्याचा आव त्याने दाखवला. याच रुबाबात त्याने 'ए' विंगची रेकी केली, कुलूप बंद फ्लॅट नसल्याने तो दोन वाजून पाच मिनिटांनी रिकाम्या हाती लिफ्टने खाली उतरला. मग त्याने 'बी' विंग कडे मोर्चा वळवला, दुसऱ्या मजल्यावर वैभव वाघ यांचा 202 नंबरचा फ्लॅट कुलूप बंद अवस्थेत त्याला दिसला. त्याने त्या फ्लॅटचा कोयंडा उचकटला, घरात प्रवेश करुन कपाटाचे लॉक तोडले आणि त्यातील पिशव्या घेऊन तो अवघ्या काही सेकंदात बाहेर ही पडला. तिसऱ्या सीसीटीव्हीत दोन वाजून दहा मिनिट झाले होते, त्याच्या हातात दिसत असलेल्या पिशव्यांमध्ये सोने-चांदीचे दागिने आहेत. तरबेज आणि शांत डोक्याचा हा चोर घरफोडी करुन लिफ्ट मागायलाही धजावत नाही. पहिल्या आणि तिसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील वेळ पाहिली तर त्याने केवळ दहा मिनिटांत रेकी करुन हात साफ केल्याचं दिसतं. या सराईत चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. बिनधास्तपणे शहरभर वावरुन तो कुलूपबंद घरं अशाच प्रकारे फोडतो आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार ही होतो. म्हणून त्याला बेड्या ठोकण्यासाठी आता पोलिसांना सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आहे. शहरातील व्हाट्सअॅप ग्रुपवर तसंच फेसबुकवर या तरबेज चोराचे फोटो व्हायरल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget