Pimpri Chichwad Mahanagarpalika: महापालिकेचा महासंग्राम: पिंपरी चिंचवडच्या आरक्षणात ऐनवेळी बदल; इच्छुकांसह समर्थक आक्रमक, न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत
Pimpri Chichwad Mahanagarpalika: इच्छुकांसह समर्थकांनी सूचना आणि हरकती नोंदवत न्यायालयात लढा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळं साहजिकच हा मुद्दा आगामी निवडणुकीच्या प्रचारात रंगणार हे उघड आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chichwad Mahanagarpalika) आरक्षणात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. त्यामुळं निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नव्यानं झालेला बदल हा प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मधील चार जागांच्या आरक्षणात (Pimpri Chichwad Mahanagarpalika) झाला आहे. मात्र यामुळं इच्छुक आणि समर्थकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आक्रमक पवित्रा घेत त्यांनी निवडणूक विभागाचे प्रमुख सचिन पवारांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. 11 नोव्हेंबरचं आरक्षण कायम ठेवा अन्यथा आम्हाला आणखी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. इच्छुकांसह समर्थकांनी सूचना आणि हरकती नोंदवत न्यायालयात लढा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळं साहजिकच हा मुद्दा आगामी निवडणुकीच्या (Pimpri Chichwad Mahanagarpalika) प्रचारात रंगणार हे उघड आहे. आक्रमक झालेल्या इच्छुक आणि समर्थकांशी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, या ठिकाणी सोडत जाहीर झाली, त्यानंतर इच्छुकांना उमेदवारी मिळाली आहे, ते तयारीला लागले आहेत, घरोघरी फिरत आहेत आणि अचानक त्यांना सांगितलं जातं की, आरक्षण बदललेलं आहे, त्यामुळे उमेदवारांवर अन्याय होत आहे, आधी जो निर्णय झाला होता तो तसाच ठेवण्यात यावा असं काही इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.(Pimpri Chichwad Mahanagarpalika)
Pimpri Chichwad Mahanagarpalika: पहिलीच घटना असेल की रात्री आरक्षण बदललेले आहे,
यावेळी बोलताना काही जण म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्व नागरिकांसमोर आरक्षण सोडत जाहीर केली होती, असं असताना काल अचानक एक बातमी आली आणि आम्हाला कळलं की आरक्षणामध्ये बदल केलेला आहे. आम्ही या सर्व बाबतीत तीव्रपणे निषेध नोंदवत आहे. येथील उपायुक्त आहे जे काम पाहत आहेत त्यांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो, इतका अनुभव असलेला माणूस या पदावर काम करत असताना त्यांच्यासमोर ही निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली, विशेष म्हणजे दहा तारखेला त्यांनी रंगीत तालीम घेतली, प्रशिक्षण सर्व लोकांना दिलं आणि असं असताना तुम्ही सर्वांसमोर आरक्षण सोडत जाहीर केली त्यानंतर बदल केला जातो ही पहिलीच घटना असेल की रात्री आरक्षण बदललेले आहे, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असंही काही इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
अकरा तारखेला झोपेत होते की स्वप्नात होते, त्यातून जागे झाल्यानंतर समजतं अशी घटना ही घडली आहे. एखादा जिवंत माणूस मृत घोषित करता अशा प्रकारची ही घटना निवडणूक आयोगाकडून घडली आहे, ज्यावेळी सर्व इच्छुक उमेदवार सर्व तयारी करतात कामे करतात त्यांच्या सर्व अपेक्षांवरती पाणी फिरलं आहे. यामध्ये मोठं काहीतरी घडलेलं आहे, मोठा आर्थिक घोटाळा ही असू शकतो, मोठं कट कारस्थान शिजून आलेला आहे, पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, या सर्व गोष्टींवरती मोठी चौकशी करावी आणि सचिन पवार आहेत, यांना निलंबित करून आणि आमचा आधीच आरक्षण आहे ते ठेवावं, नाहीतर नव्याने आरक्षण जाहीर करावं अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केली आहे.
सर्व नागरिकांच्या समोर सोडत झाली होती, त्या सोडतीची हरकत घ्यायची होती, ती तारीख कालपासून सुरू झाली होती. जर हरकत आली नाही तर त्यांनी परस्पर सोडत कशी बदललेली, आमचं वैयक्तिक म्हणन आहे, यामध्ये काहीतरी त्या अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार झालेले असतील, त्याचबरोबर कोणाचा तरी दबाव असेल, कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या नेत्याचा आहे, ते आम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे, आमची मागणी आहे आमचं जे आरक्षण दिलेलं आहे, ते कोणत्याही परिस्थितीत बदललं गेलं नाही पाहिजे, असंही काही इच्छुकांनी म्हटले आहे.
Pimpri Chichwad Mahanagarpalika: नेमकं काय घडलंय?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागातील चार जागांवरील आरक्षणात बदल केला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणात बदल झाला आहे. प्रभाग क्र.३० मधील ओबीसी जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे प्रभाग क्र.१९ मधील आबीसी जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. सर्वसाधारण जागेवरील प्रभाग क्र.३० मधील महिला आरक्षण रद्द झाले असून प्रभाग क्र.१९ मधील एक सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या सोडतीनंतर प्रभागातील आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले.अऩुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणांमुळे अनेक प्रभागात काही माजी नगरसेवक व इच्छुकांचा पत्ता कट झाला. तर, काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची वेळ आली. मात्र, या आरक्षण सोडतीनंतर निवडणूक आयोगाने दुरुस्ती सूचवत दोन प्रभागातील आरक्षणात बदल केला. त्याचा चार जागांवर परिणाम झाला आहे.आयोगाने केलेल्या दुरुस्तीनंतर प्रभाग क्र.३० मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. तर, याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ती जागा सर्वसाधारण झाली आहे. तर, ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. त्यामुळे सोडतीत चिठ्ठी काढून सर्वात शेवटी प्रभाग क्र. १९ मधील ब जागा आबीसी महिलांसाठी राखीव झाली होती. त्या जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. तर. प्रभाग ३० मधील ड जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून प्रभाग क्र.१९ मधील क जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.
दरम्यान, दोन प्रभागातील चार जागांवर झालेला हा बदल अनेक इच्छुकांसाठी परिणामकारक ठरणार आहे. परंतु, ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आलेला आहे, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. तसेच, निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणतीही हरकत असल्यास ती नागरिकांना निवडणूक आयोगाकडे नोंदविता येणार असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
Pimpri Chichwad Mahanagarpalika: बदलानंतर दोन प्रभागातील आरक्षणाचे चित्र...
प्रभाग क्रमांक -१९ उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ - अनुसूचित जाती - महिला
ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क - सर्वसाधारण (महिला)
ड - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - ३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ - अनुसूचित जाती
ब -अनुसूचित जमाती - महिला
क - नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला
ड - सर्वसाधारण
























