Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे, शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पुणे: आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी होते. मोठ्या प्रमाणावर भाविक मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, यासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी केली जाते, यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय, सुरक्षा, वैद्यकीय मदत अशा गोष्टींसाठी प्रशासन आधीच सर्व तयारी करून ठेवते. यावेळी गणपती विसर्जनाच्या (Pune Ganesh Visarjan) दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे, शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सोईसाठी रात्रभर मेट्रोदेखील सुरू ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, एफ सी रोड, कर्वे रोड, प्रभात रोड
पार्किंगची व्यवस्था कुठे?
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)
विसर्जनाच्या दिवशी दिवस-रात्र सुरू राहणार मेट्रो
आज विसर्जनाच्या दिवशी (17 सप्टेंबर) सकाळी 6 वाजता सुरू होणारी मेट्रो (Pune Metro) दुसऱ्या दिवशी (दि. 18) सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सलग 24 तास धावणार आहे. 18 सप्टेंबरला पुन्हा ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत धावणार आहे.
या वर्षी गणेशोत्सवात मेट्रो सलग 40 तास धावणार आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी वेळेत व फेऱ्यांमध्ये वाढ केली असली तरी मेट्रो प्रशासनाने दर 'जैसे थे'च ठेवले आहेत, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pune Ganesh Visarjan)
तुम्ही कोणत्या ठिकाणी मिरवणुकीत होऊ शकता सहभागी?
लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड या ठिकाणी तुम्ही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ शकता.(Pune Ganesh Visarjan)