एक्स्प्लोर
आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया सुळेंची ताटातूट होऊ नये : पंकजा
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही भावंडं एकमेकांच्या नात्यांवर बोलण्यास टाळतात. मात्र खूप दिवसांनी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता, त्यांच्यासोबतच्या ताटातुटीचा उल्लेख केला आणि काहीशा भावूक झाल्या.
![आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया सुळेंची ताटातूट होऊ नये : पंकजा Pankaja Munde talks on Ajit Pawar and Supriya Sule latest updates आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया सुळेंची ताटातूट होऊ नये : पंकजा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/10155514/munde1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : आम्हा भावा-बहिणीची जशी ताटातूट झाली, तसे कटू अनुभव अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना येऊ नयेत, असे भावूक उद्गार राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहीण आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी भाजपला राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांचे आणि पंकजा मुंडे यांच्यातील सुसंवाद सुरु राहिला नाही. उलट त्यांच्यातील विसंवादच वाढत गेला आणि अनेकदा जाहीर व्यासपीठावरुनही या मुंडे भावंडांनी एकमेकांवर टीकाही केली.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही भावंडं एकमेकांच्या नात्यांवर बोलण्यास टाळतात. मात्र खूप दिवसांनी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता, त्यांच्यासोबतच्या ताटातुटीचा उल्लेख केला आणि काहीशा भावूक झाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)