एक्स्प्लोर

Pune Citizen In Amarnath: चिंताजनक! अमरनाथ यात्रेला गेलेले पुण्यातील 14 भाविक संपर्काबाहेर; 36 नागरिक सुखरुप

पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते.

Pune Citizen In Amarnath:  पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवज शहरातून अनेक भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. मोठ्या भक्तीने ते यात्रा करतात. मात्र यावर्षी मोठी दुर्घटना घडल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक (DG) अतुल करवाल यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. सुमारे 40 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्या पथकाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही काही जणांचा शोध अजूनही सुरु आहे.

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली होती त्यामुळे अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर आणि तंबू वाहून गेले होते. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस, एनडीआरएफ आणि एसएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांचा देखील यात समावेश आहे.

अमरनाथ गुहेच्या सखल भागात शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पहलगाम संयुक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Embed widget