एक्स्प्लोर

लॉकडाऊनमध्ये पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांना एक दिवसाचा दिलासा; 'ही' दुकाने उद्या सुरू राहणार

गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळं उद्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार 10 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. यांनी हा आदेश दिला. त्यानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी शहरात सुरू होती. परंतु सलग पाच दिवस दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसाचा दिलासा दिला आहे.

रविवारी ( 19 जुलै) पुण्यात सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळं उद्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा माल आणि चिकन- मटणची दुकानं आणि ठोक विक्री करणारी दुकानं सुरू ठेवण्यासाठी ही परवानगी महापालिकेने दिली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतची ही मुभा उद्या फक्त रविवारपुरती असेल. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांना पुन्हा वेळेची मर्यादा लागू होईल. उद्या आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने लोकांकडून चिकन - मटणची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरेदी करताना लोकांनी गर्दी टाळणं आवश्यक आहे. महापालिकेकडून त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी- चिंचवडलाही दिलासा

पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन आज रात्री 12 पासून शिथिल करण्यात येणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. रविवारी (19 जुलै) म्हणजे उद्या गर्दी होईल म्हणून सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान ही दुकानं खुली राहतील. तर 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच मुभा असेल.

संबंधित बातम्या :

Special Report | कोरोना रुग्णसंख्या वाढीत ठाणे पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget