एक्स्प्लोर

Old Pune-Mumbai highway Accident : पुणे-मुंबई जुना महामार्ग अपघात: 12 वर्षाचा वीर वादन करुन दमला...बसमध्ये झोपला अन् उठलाच नाही

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शनिवारी भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वीर मांडवकर या बारा वर्षीय चिमुरड्याचा देखील समावेश आहे. याच वीरचा आता ढोल वाजत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Old Pune-Mumbai highway Accident :  जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शनिवारी भीषण अपघात झाला. दरीमध्ये बस कोसळून 13 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईहून पुण्याला एक ढोल पथक आलं होतं. पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपरी गुरव या ठिकाणी या पथकाने ढोल वादन केले होते. ढोल वादन संपल्यानंतर परत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात काही लहान मुलांचा देखील मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वीर मांडवकर या बारा वर्षीय चिमुरड्याचा देखील समावेश आहे. याच वीरचा आता ढोल वाजत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वीर याला ढोल वाजवण्याचा छंद होता. गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकात तो वादन करायचा. आंबेडकर जयंती निमित्त हे पथक पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात आले होते. मात्र वादन संपल्यानंतर पुन्हा घरी परत जात असताना खोपोली जवळ त्यांच्या बसला अपघात झाला. बस खोल दरीत कोसळली आणि यामध्ये तेरा जणांना आपले प्राण गमवावे लागले. चिमुकल्या वीरचे हे आंबेडकर जयंती निमित्त केलेले ढोल वादन अखेरचे ठरले. वीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर आणि बाजीप्रभू ढोल ताशा पथकावर दुःख कोसळले आहे.

वीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ढोल ताशा वादन म्हटलं की अनेकांमध्ये फार उत्साह असतो. वीर हा त्यांच्या पथकातील सर्वात लहान वादकांपैकी एक होता. वीरने सगळ्या मिरवणूकीत जल्लोषात वादन केलं. घामेघूम होतपर्यंत जातपर्यंत त्याने वादन थांबवलं नव्हतं. त्याच्यासोबत इतर वादकांनीही जोरदार वादन केलं. यांच्या शेवटच्या वादनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वीर वादन करताना दिसत आहे. त्याच्यासोबत इतर वादकही दिसत आहे. वादनाचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

12 वर्षाचा वीर वादन करुन दमला... गाडीत झोपला अन् उठलाच नाही...

वीर जल्लोषात वादन करुन परतीच्या प्रवासासाठी निघाला होता. दमला असल्याने तो झोपला. त्याच दरम्यान बस दरीत कोसळली आणि निवांत झोपलेला विर उठलाच नाही. घरातील 12 वर्षांचं खेळत , बागडतं मुल गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. शिवाय सोबतच्या अनेक पालकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
Embed widget