एक्स्प्लोर

माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरतो, लवकरच देशात सीएनजीवरील ट्र्रॅक्टर; नितीन गडकरींची घोषणा

देशात टनेल बनवणं हे भविष्याच्या बाबतीत खूप फायद्याचं ठरेल, येणाऱ्या काळात देशात 3 लाख करोड रुपयांची टनेल आपण बनवणार आहेत.

पुणे : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून सातत्याने नवसंकल्पना आणि नवतंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, नवतंत्रज्ञान वापराचा सल्लाही ते देत असतात. देशातील दळणवळण अधिक गतीमान व्हावं आणि प्रवासी, नागरिकांना कमी खर्चात वाहने, इंधन उपलब्ध होण्यासाठीचाही त्यांचा प्रयत्न असतो. आता, पुणे (Pune) येथील आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत बोलताना त्यांनी टनेल बनविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तर, आता शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टरदेखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉल, CNG (CNG) वर चालणारे बनवत आहोत. माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरत आहे, शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे, असेही गडकरी येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले. 

देशात टनेल बनवणं हे भविष्याच्या बाबतीत खूप फायद्याचं ठरेल, येणाऱ्या काळात देशात 3 लाख करोड रुपयांची टनेल आपण बनवणार आहेत. आपल्या देशात बोगद्याची मशिन आपल्याला बनवावी लागेल. कारण, सध्या टनेल (बोगदा) बनवण्याची मशीन फक्त चीनमध्ये बनते, सध्या चीनकडून आपण हे घेऊ शकत नाही, त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत, असे म्हणत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशात अधिकाधिक बोगदे बनविण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच, यात आपल्याला सुरक्षा देखील पाहावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.  

माझ्या शेतात CNG वरील ट्रॅक्टर

टनेल बोगदे बनवताना आपली सुरक्षा महत्वाची आहे, अनेक घटना देशात दुर्दैवी घडल्या त्यात आपल्याला आता AI आणावा लागेल तर आपण पुढ जाऊ शकतो. नवीन मशिन दुसऱ्या देशातून विकत घेणं थोडं महागाचं ठरत आहे. आपल्याला याचे उत्पादन आपल्याच देशात करावे लागेल, मशीन आपल्याला इथंच बनवाव्या लागतील, असेही नितीन गडकरी यांनी म्हटलं. आता सगळीकडे हायड्रोजन, इथॉनल या इंधनाचा वापर आपल्याला करावा लागेल. यात मी खूप काम करत आहे, आपल्याला मिळून यात काहीतरी करायला हवं. आता ट्रॅक्टर देखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉल, CNG वर चालणारे आपण बनवत आहोत. माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरत आहे, शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले. 

कॉन्ट्रॅक्टरला

आता टनेलिंग मशीनसाठी देखील अशा पर्यायी इंधनाचा वापर करावा लागेल, आता दुचाकी गाडी देखील CNG वर आली आहे. यात पैशाची खूप बचत होते, याचा विचार आपल्याला करावा लागेल. देशात काही टोल कंपन्या नखरे करत आहेत, आता मी ठरवलं आहे की, या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकणार आणि ठोकणार, असा इशाराच मंत्री महोदयांनी दिला. तसेच, कामात कामचुकारपण करू नका, असा सल्लाही दिला. 

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार

टोल नाके आता बंद झाले आहेत नवी टेक्नॉलॉजी आणली आहे. पुणे जिल्ह्यात मी 50 हजार कोटी रुपयांचे पूल बनवत आहे, सगळी नवी टेक्नॉलॉजी यात आणली आहे. नवं तंत्रज्ञान वापरून आपल्याला देशाला सक्षम बनवाव लागेल, असेही गडकरींनी सांगितले. 

हेही वाचा

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget