एक्स्प्लोर

Nilesh Chavan: पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी अर्ज फेटाळूनही निलेश चव्हाणला शस्त्रपरवाना मिळवून देणारे मंत्रालयातील ते अधिकारी कोण?

Nilesh Chavan: पोलिसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर त्या व्यक्तीला मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मंत्रालयात उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो, अशी माहिती आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला 2022 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला होता. मात्र हा परवाना देण्याआधी काही महिने त्याच्यावर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी शस्त्रपरवान्याचा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयामध्ये अपील करुन शस्त्रपरवाना मिळवल्याचं सांगण्यात येतं आहे. निलेश चव्हाणला पुणे पोलीसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून तो मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. पोलिसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर त्या व्यक्तीला मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मंत्रालयात उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो, अशी माहिती आहे. 

शस्त्र परवाना देण्याआधी काही महिने त्याच्यावर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी शस्त्रपरवान्याचा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयामध्ये अपील करुन शस्त्रपरवाना मिळवल्याचं सांगण्यात येतं आहे. निलेश चव्हाणला पुणे पोलीसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून तो मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली, अशी चर्चा आहे. निलेश चव्हाणच्या शस्त्रपरवान्याचा आयुक्तांनी अर्ज फेटाळला होता, मात्र, त्याने मंत्रालयातून शस्त्र परवाना मिळवला आहे. पुणे पोलीसांनी आधी चव्हाणचा अर्ज फेटाळला होता, अशी माहिती आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण याने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता. पोलिसांनी त्याचा अर्ज सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळला. यानंतर चव्हाणने गृह विभागात अपील केले. 

पोलिसांनी चव्हाणकडे केलेला तपास व जप्त मुद्देमाल

- पंचनाम्याद्वारे चव्हाणचा मोबाईल, पासपोर्ट, लॅपटॉपसह पिस्तूल जप्त.
- गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची नोंदणी प्रत प्राप्त करण्यात आली आहे.
- शशांक आणि वैष्णवी यांचे मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट स्क्रीनशॉट जप्त.
- लता, करिष्मा आणि शशांक यांचे मोबाईल चव्हाणकडून जप्त.
- चव्हाणने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी चिथावणी दिली.

निलेश चव्हाणकडून या गोष्टींचा केला जाणार तपास

वैष्णवीचे बाळ ताब्यात असताना चव्हाणने बाळाशी कोणत्या प्रकारची गैरवर्तणूक केली का? त्याने कोणत्या कारणांस्तव अनधिकृतपणे बाळाचा ताबा घेतला? निलेश आणि इतर आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले? चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्य यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यातून हा गुन्हा करण्यात आला आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. 

निलेशच्या घरात पोलिसांना काय सापडलं?

निलेशच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल आणि पासपोर्ट या वस्तू जप्त केल्या. पोलिसांकडून निलेशची कसून चौकशी केली जाते आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरी आढळून आले. निलेश चव्हाणकडून याआधी 3 मोबाईल जप्त केले. शनिवारी आणखी 3 फोन जप्त केले. जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात! गॅस टँकरची दुचाकीला जोरदार धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू
पुण्यातील खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात! गॅस टँकरची दुचाकीला जोरदार धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
Pune Crime News: जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव
जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव
Maharashtra SSC Exam Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी
दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Embed widget