एक्स्प्लोर

Pune Weather : दुपारी ऊन तर रात्री थंडी; पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा

पुणे शहरात थंडीचा कडाका (winter) वाढत आहे. शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

Pune Weather : पुणे शहरात थंडीचा कडाका (winter) वाढत आहे. शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री गुलाबी थंडी अनुभवत आहेत.  4 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे. 

शुक्रवारी पाषाण येथे रात्रीचे तापमान 11 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 16.7 अंश सेल्सिअस, लवळे येथे 17.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 17.4 अंश सेल्सिअस होते. तर शुक्रवारी शहरात दिवसाचे तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले म्हणजे नेहमीपेक्षा 1.9 अंश सेल्सिअस जास्त आणि रात्रीचे तापमान शुक्रवारी सामान्यपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस थंड होते.

दिवसाचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शहरात थंड हवामान असेल. या वेळी रात्रीचे तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस असू शकते. दुपारी भरपूर ऊन आणि रात्री थंड वातावरण असणार आहे, असं  पुण्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणेकरांना ऊन आणि थंडी दोन्ही अनुभवायला मिळत आहे.  

अनेक ठिकाणी शेकोट्या

हिवाळ्याची सुरुवात होताच आता शहरात अनेक परिसरात रात्री शेकोट्या दिसत आहेत. अनेक रस्त्यांवर किंवा घराच्या अंगणात पुणेकर थंडी अनुभवत आहेत. थंडीमुळे शहरात रात्री लवकरच शुकशुकाट व्हायला सुरुवात होते. रस्त्यांवर गाड्यांचं प्रमाण देखील कमी असतं. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही दिवसांपासून कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र दिवसभर पुणेकरांना चांगल्याच उष्ण वातावरणाला सामोरं जावं लागत आहे. दिवसभर ऊन सावल्यांचं खेळ बघायला मिळत आहे. थंडी वाढल्याने शहरात थंडीच्या कपड्यांचा नवा ट्रेन्डही बघायला मिळत आहे. कॉलेजमध्येही थंडीच्या सीझनमधील कपड्यांचा ट्रेन्ड बघायला मिळत आहे.

राज्यभरात थंडी
शुक्रवारी मुंबईतील सांताक्रूझमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते तर औरंगाबादमध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये राज्यातील बहुतांश भागात रात्री थंड राहण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा उत्तरेकडे बर्फवृष्टी होते आणि भारताच्या दक्षिणेकडील भागात थंड वारे वाहतात तेव्हा महाराष्ट्रात तापमान कमी होते, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget