नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय. साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले.
![नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी New Year Celebration Begins with Darshan Crowd of Devotees at Siddhivinayak Temple in Dagdusheth Shirdi and Mumbai नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/01/c5ed40f14403d9222fe98053146076a4170409267153589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी (Shirdi) , पंढरपूर (Pandharpur), शेगावमधील (Shegaon) मंदिरात भाविकांनी गर्दी केली. या निमित्तानं मंदिरं देखील आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आली होती. साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय. साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले. तर इकडे पंढरपुरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताला विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही आकर्षक फुलं आणि फळांची सजावट करण्यात आलीय.
नवीन वर्षाचे स्वागत साई दरबारी करता यावे म्हणून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने मोठ्या संख्येने साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
पंढरपूरच्या मंदिराला आकर्षक सजावट
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आळंदी येथील विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक फळे आणि फुलांच्या मदतीने सजावटीची सेवा अर्पण केली आहे . विठ्ठल मंदिरातील चौखंबी , सोळखंबी तर रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मंडप येथे ही सजावट करण्यात आली आहे . यासाठी सूर्यफूल , झेंडू , गुलाब , शेवंती , जरबेरा , लीली अशा 16 प्रकारच्या दीड टन फुलांचा वापर करण्यात आला आहे . याशिवाय सफरचंद , अननस , संत्री , मोसंबी , डाळिंब अशा 500 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे . मंदिराचे कर्मचारी राघू शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सहा तास राबून ही सजावट केली आहे . नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दर्शनाला आले असताना या भाविकांचे स्वागत आकर्षक सजवतीने करण्यात आली आहे .
पुणेकरांची नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने
पुणेकरांनीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन केली. यावेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती. तसंच बाप्पाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती.आई अंबाबाई कोरोनासारख संकट तेवढं येऊ देऊ नको करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी कोल्हापुरात राज्यभरातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली केली आहे. नवीन वर्षाच्या स्वगातासाठी शेगावात संत गजानन महाराजांच्या भक्तांनी आज दर्शनासाठी गर्दी केली.मुंबई , नाशिक, पुणे तसंच गुजरात , मध्यप्रदेशातून भाविक आज शेगावात आले आहेत.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)