एक्स्प्लोर

देहूला गेल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नसतं : शरद पवार

Pimpri Chinchwad News Update : संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Pimpri Chinchwad News Update : "देहूला गेल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नसतं. जगद्गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं असतं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले. जगद्गुरूंच्या जीवनातील बारा प्रसंगांवर आधारित चित्र रेखाटून त्यांचं कार्य घराघरात पोहचवण्याचा हेतू होता. यास संमती मिळाली अन् शेगावच्या कलाकाराने ते सत्यात उतरवलं असंही ते म्हणाले. 

संत तुकाराम महाराजांच्या ( Saint Tukaram Maharaj ) जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत पार पडला. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. "देव धर्म यापासून मी बाजूला असतो. माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत, त्यातील शेगाव एक आहे. आता ते गृहस्थ सध्या नाहीत, मात्र त्यांचे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत. त्याच शेगावचे हे कलाकार असल्यानं आनंद झाला, असं शरद पवार यावेळी म्हणाले. 

"पंढरीला गेल्याशिवाय मानसिक समाधान भेटत नाही. ही पंढरी अनेक दृष्टीने महत्वाची आहे. 1972 साली पुणे आणि सोलापूरच्या सीमेवर उजनी धरण उभारण्यात आले. तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी चव्हाण यांनी पंढरीचा उल्लेख केला. चंद्रभागेच्या तिरात वारकरी स्नान करतो त्या चंद्रभागेत पाणी कुठून येतं? तेव्हा उजनी धरणाचे पाणी या शिवारात जाईल. त्या शेतकऱ्यांचे पीक पिकेल, तो सुजलाम सुफलाम होईल. मग तो चंद्रभागेत स्नान करूनच विठुरायाच्या दर्शनाला येईल, असा विचार यशवंतराव चव्हाण यांनी केला होता, असे शरद पवार म्हणाले.  

 शरद पवार म्हणाले , "गेल्या 400 वर्षांपासून समाजाला योग्य दिशा देण्याचं महान काम कोणी केलं असेल तर ते नाव म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं आहे. शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी कार्य केलं ते म्हणजे संत तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांच्यावर आधारित ही दिनदर्शिका होणं आणि ती घरोघरी पोहचणं हे महत्त्वाचं आहे."

शरद पवारांनी 25 वर्षांनी घेतलं संत तुकाराम महाराजांचं दर्शन

दरम्यान,  शरद पवार यांनी आज 25 वर्षांनी जगतगुरु संत तुकोबांचे मुख्य मंदिरात येऊन दर्शन घेतलं. यावेळी देहू संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वाची बातमी 

Ashok Chavan : सरकारच्या विरोधात बोललं तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो; अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Embed widget