Swarget Bus Depo Crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरेंची पोस्ट चर्चेत; DCP गिल यांच्यासोबतच्या चर्चेचा संदर्भ देत म्हणाल्या, 'संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे...'
Rupali Patil Thombare on Swarget Bus Depo Crime: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील केलेल्या एका सोशल मिडिया पोस्टने खळबळ उडाली आहे.

पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका प्रवासी 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी मध्यरात्री पोलिस, इतर टीम, ड्रोन, श्वान पथक, आणि ग्रामस्थ यांनी मिळून आरोपी नराधम दत्ता गाडेला अटक केली आहे. आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यायान युक्तीवाद करताना कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांनी हे संबंध संमंतीने झाल्याचं आणि प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील केलेल्या एका सोशल मिडिया पोस्टने खळबळ उडाली आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वारगेट बसमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा वकिलांनी केला त्यानंतर आता रूपाली पाटील यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "पुणे शिवाजी कोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली."
"मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल,आरोपीला काळे फसणार करणार असेल तर प्लीज करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेलतर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे.केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे, असंही त्यांनी पुढे लिहिले आहे.
"पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो, असा दावा ठोंबरे यांनी केला. दुसरे बस स्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला.आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच",असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.























