एक्स्प्लोर

Ajit Pawar : चांगलं काम  होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल   

Ajit Pawar : "केंद्र सरकार पीक कर्ज  घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाचे दोन टक्के सरकार भरत होते. पंरतु, आता केंद्र सरकारने हात वर केले आहेत. आता त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय.

पुणे : बारामती शहरात काही झालं तरी पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था केली आहे. हे करताना थोडा त्रास झाला, काहींची नाराजी ओढवावी लागली. भाजपचे सरकार असताना पाण्याचा निर्णय घेतला होता.  त्याचा फटका आपल्याला बसला. पंरतु आपलं सरकार येताच तो निर्णय बदलला. त्यामुळे आपल्याला परत पाणी मिळाले. चांगलं काम  होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात, असा हल्लोबल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केलाय. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात कृष्णाली ऍग्रो एजन्सीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.  

अजित पवार म्हणाले, "पालखी मार्ग करताना शेतकऱ्यांना पैसे मिळतात. परंतु, जुने रस्ते रुंदीकरण करताना पैसे मिळत नाहीत.  शेतकऱ्यांच्या मुलांना या पुढं व्यापारी दृष्टीकोन ठेऊन काम करावं लागणार आहे. कोरोना काळात जीडीपी ढासळला. परंतु, कोरोनाच्या काळात इतरांच्या तुलनेत शेतीचे  नुकसान कमी झालं. आता शेती करताना आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे . आदी लोक नोकरीला प्राधान्य देत होते. परंतु, आता कष्ट केले तर शेतीत फायदा होत आहे. 

"केंद्र सरकार पीक कर्ज  घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाचे दोन टक्के सरकार भरत होते. पंरतु, आता केंद्र सरकारने हात वर केले आहेत. आता त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. शेतकऱ्यांनी पैसे घेण्याआधी केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं, आम्ही व्याज देणार नाही. आता त्यावर राज्याचे सहकार मंत्री काय भूमिका घेणार हे बघावं लागणार आहे. भाजप सरकारने बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याचा निर्णय घेतला. वीरच्या वरच्या तीन धरणाचे पाणी वीर धरणात येतं. येत्या चार-पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडेल अस हवामान खात्याने सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.  

अजित पवार म्हणाले, "बारामती शहरात अस्थिरीकरण केल्यानंतर बारामतीतील अशोक नगरच्या भागात पणी कमी पडले अशी माहिती मिळत आहे. कॅनॉलमध्ये ज्या ठिकाणी वळणे असतात त्या ठिकाणी पाणी पाजरते म्हणून त्या ठिकाणी लायनींग करायचं होतं. अस्थिरीकरनाच्या मुद्यावर काही बाहेरचे नेते आले आणि नीट माहिती न घेता बोलू लागले. त्यामुळे आता सगळ्या ठिकाणी लायनींगचे काम होणार नाही. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल त्याच ठिकाणी लायनींगचे काम केलं जाईल. 30 वर्षांपासून काम करत आहे. काही लोक वातावरण खराब करत आहेत, त्यांना साथ देऊ नका. लोकांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील."  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Mumbai-Pune Bullet Train : रेल्वेमंत्र्यांनी केली पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा; म्हणाले, दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव खायला जा अन् पुण्यात येऊन बाकरवडीही खा; फक्त 48 मिनिटांत होणार प्रवास
रेल्वेमंत्र्यांनी केली पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा; म्हणाले, दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव खायला जा अन् पुण्यात येऊन बाकरवडीही खा; फक्त 48 मिनिटांत होणार प्रवास

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget