एक्स्प्लोर

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे पुण्याच्या PMPML अर्थात सिटी बसचा कारभार दिला जावा, अशी मागणी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी केली होती. मुंढे यांची तडकाफडकी बदली करुन त्यांच्या जागी रामास्वामी एन. हे नवी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. मात्र मुदतीच्या आधीच मुंढेंची बदली झाल्यानं नवी मुंबईतल्या नागरिकांमध्ये  नाराजी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची बदली टाळली होती. अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर भाजपने ठरावाच्या विरोधात म्हणजेच मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं. महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. तुकाराम मुढें यांच्यासोबत इतरही दोन आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची भंडाऱ्याच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे

आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर

सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण

‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव

…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!

नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम

नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई

तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget