एक्स्प्लोर
अनोखळी व्यक्तीची हत्या करुन स्वत:च्या हत्येचा बनाव, रिक्षाचालक अटकेत
पुणे: कर्ज फेडणं शक्य नसल्यानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या रिक्षाचालकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीची हत्या करुन स्वतःचीच हत्या असल्याचा बनाव रचणाऱ्या सतीश भालेरावला 24 तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पेंटिंगचं काम करणारा अविनाश कामासाठी म्हणून घराबाहेर पडला तो घरी आलाच नाही. आली ती त्याच्या मृत्यूची बातमी. रिक्षाचालक सतीश भालेराव याच्या डोक्यावर अमाप कर्ज झालं. ते फेडणं शक्य नाही हे कळल्यानंतर त्यानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव केला आणि या बनावाचा बळी ठरला अविनाश.
अविनाशची हत्या करुन सतीश हुबळीला पळून गेला. मात्र, पोलिसांनी केवळ 24 तासांत त्याला पकडलं. मृत अविनाशला चार बहिणी असून एका बहिणीचं लग्न व्हायचं आहे. इतकंच काय तर या गुरुवारी त्याच्याही लग्नाची बोलणी होणार होती. त्यापूर्वीच त्याची निर्घृण हत्या झाली.
एका कुटुंबाचा आधारस्तंभ हरवला. एकाचवेळी चार आयुष्य पोरकी झाली. त्यामुळं सतीशला फाशी देण्याची मागणी कुटुंबानं केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement