एक्स्प्लोर
पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा आवळून हत्या
पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पहिल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. नंदा भोंडवे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी पती गणेश भोंडवेला पोलिसांनी अटक केली आहे.
10 वर्षांपूर्वी नंदा आणि गणेशचा विवाह झाला होता. पण त्यानंतर गणेशनं दुसरं लग्न केलं आणि सध्या तो दुसऱ्या पत्नीबरोबर राहत होता. यावेळी नंदाकडे त्याचं येणजाणं सुरुच होतं. भावाकडे राहणाऱ्या नंदाच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घ्यायचा. यावरुन त्यांच्यात बरेच वादही झाले होते.
1 एप्रिलपासून आरोपी गणेश पहिली पत्नी नंदाकडेच राहत होता. काल या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात गणेशनं गळा आवळून नंदाची हत्या केली. दरम्यान, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement