एक्स्प्लोर

MPSC Exam | पुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली.

पुणे : राज्य सरकारने एमपीएससीची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीएससी परीक्षेची तारीख आज जाहीर होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. आज परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे  विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशीलरित्या हाताळावं अशी सूचनाही केली. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. 

संबंधित बातम्या :

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget