एक्स्प्लोर

MPSC Exam Postponed | पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले आहेत.

पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली. 

एमपीएसी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयवर उमेदवारांचे दोन मतप्रवाह : 

आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सेंटरवर 500 किमी दूर गेली पण येथे एमपीएसीने हवी ते सेंटर देऊनसुद्धा परीक्षा पुढे ढकलली? आरोग्य विभागाच्या परीक्षा घेऊन त्यात घोळ केला? तो घोळ करायचं म्हणून परीक्षा घेतल्या का? 

एमपीएसी समन्वय समितीतील उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचा विरोध केला आहे. परीक्षा या पुढे न ढकलता अनेक विद्यार्थी परीक्षा तयारीसाठी सेंटरच्या शहरात आलेले असताना तीन दिवसांआधी परिक्षा पुढे का ढकलली जाते?

रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु : सूत्र

कोरोनामुळं एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.  परीक्षा पुढे ढकलण्याच्या MPSC च्या निर्णयामुळे सरकारविरोधात रोष निर्माण झालं आहे. पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं आहे. MPSC ने सरकारशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

MPSC Exam Postponed | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget